अमळनेर न पा निवडणुकीत आज दि २६ रोजी अपक्ष उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्यात आले. आपल्याला काय चिन्ह मिळते, या कडे अनेक उमेदवारांचे लक्ष लागून होते. मार्जितील व प्रचलित चिन्ह मिळावे म्हणून अनेकांनी देव पाण्यात सोडलेले होते. यात अनेकांना अपेक्षित चिन्हे मिळाल्याने आनंदी होते तर काही अपेक्षित चिन्ह नमिळाल्याने नाराज झाल्याचे बघायला मिळाले.

