अमळनेर येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद प्रथमच अनुसूचित जमाती करीता जाहीर झाल्याने सुरुवातीला स्थानिक राजकारण्या मध्ये नैराश्याचे वातावरण बघायला मिळाले. निवडणुकीत पाहिजे तसा उत्साह दिसून आला नाही.नाईलाजास्तव काना खालचा उमेदवार शोधण्याची धावपळ सुरु झाली होती. यातच शहर विकास आघाडी कडे उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांचा कल दिसला. या स्पर्धेत आघाडीने पत्रकार जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून डॉ परीक्षित बाविस्कर यांना उमेदवारी दिली. तर उबाठा सेने तर्फे सौ शोभा संजय पारधी यांना उमेदवारी दिल्याने तिरंगी लढत होणार आहे.

