उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रमाणीत करने आवश्यक आहे – जिल्हाधिकारी घुगे

    जळगाव : जिल्हयातील एकूण १५ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची धुमाळी उडाली आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमाचा अवलंब करीत आहे.प्रिंट मीडिया सह इलेक्ट्रॉनिक मीडिया चा ही जोरदार वापर केला जात आहे 

     याच पारश्वभूमीवर या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती या प्रसारणापूर्वी जिल्हास्तरिय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरिय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी केले आहे.

     या निवडणूकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत,नगरपरिषद, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्ष अधिनियमाखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना यानुसार निवडणुक लढविण्याच्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.

     सर्व प्रकारच्या इलेक्टोनिक माध्यमावर प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातीचे प्रसारमाध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाण करून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्टोनिक जाहिराती प्रसारणा पूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी(जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती इमारत पहिला मजला,आकाशवाणी चौक,जळगाव ) यांच्याकडे अर्ज सादर करावेत. प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल.

    पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरात निर्मिती खर्चाचे देयक, जाहिरातीचा पेन ड्राईव्ह / सीडी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुदरीत प्रती सोबत जोडाव्यात,असेही आवाहन जिल्हाधिकारी घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!