रात्रीची पहाट व पहाटेची रात्र करत प्रभाग 13-ब मधील अपक्ष उमेदवार सुनील महाजन यांचा प्रचार दौरा…

      अमळनेर येथील नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रं १३ ब मध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार सुनील महाजन यांचा वैध होताच रांत्र दिवस प्रचाराला वेग दिला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

        सुनील महाजन यांनी प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्याचा चंग बांधत मतदारांच्या घराघरांत जाऊन गाठीभेटी सुरू केल्या असून, त्यांच्या या संवाद यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

          सुनील महाजन यांची ओळख ही एक प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि स्वच्छ प्रतिमा अशी असल्याने व पोलीस प्रशासनातील दांडगा अनुभव असल्याने निवडून आल्या नंतर प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नक्कीच कटीबद्ध असतीलच, हा विश्वास मतदारांना देण्यात सुनील महाजन यशस्वी होतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक त्यांच्याबाबत सकारात्मकता विचार व्यक्त करत असून, “प्रामाणिक आणि काम करणारा उमेदवार मिळत आहे” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!