अमळनेर येथिल विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली.उद्याचा मतमोजणी साठी अमळनेर महसूल विभाग सज्ज झाला असून जय्यत तयारी सुरू आहे.सदर मतमोजणीस एकूण 23 टेबलांवर होणार असून त्यापैकी 6 टेबलांवर टपाली मतमोजणी,3 टेबलांवर ETPBS अर्थात सैनिकांनी केलेल्या ऑन लाईनची मतमोजणी होणार आहे.याकामी महसूल प्रशासनाचे जवळपास 200 कर्मचारी हे काम तडीस घेऊन जाण्यास तैनात करण्यात आले आहे.

मतमोजणी साधारणतः सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे तर सर्व निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून सूक्ष्म निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सुध्दा सज्ज झाले असून याकामी जवळपास १० पोलिस अधिकारी,७० पोलिस कर्मचारी, २० CRPF व २० SRPF पोलिस जवान दिमतीला असणार आहे.

पोलिस निरीक्षक विकास देवरे…. मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाहक गर्दी करू नये.आलेल्यांनी गडबड गोंधळ घालू नये.कायदा हातात घेण्याचा प्रयत्न चुकूनही करू नये आणि कोणी केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.कोणाची ही हयगय केली जाणार नाही.नागरिकांनी मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.निवडून आलेल्या उमेदवार सह कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखवेल अश्या घोषणा अथवा वक्तव्य करू नये.शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये.
