अमळनेरकर झाले मंत्री अनिल पाटील यांच्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार… 32,667 मतांच्या फरकाने विजयी

अमळनेर विधानसभा निवडणूकी कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. या अत्यंत चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी 1,09445 मतांनी विजय मिळवला. त्यांनी 32,667 मतांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव करावा केला. तर महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.नियोजनाबद्ध प्रचार प्रसार व उत्तम संघटन कौशल्यच्या जोरावर अनिल पाटील यांचा विजय शक्य झाल्याची चर्चा सर्वत्र होती.या जोरावर अनिल पाटील यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. अमळनेरच्या निवडणुकीत विकासकामावर त्यांना मतदारांनी विजयाच्या शिखरावर पोहचवले.

आमदार अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यकर्ते त्यांच्या विजयाचा जल्लोष करत होती. महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला गेला.मिरवणुकीच्या रस्त्यावर गुलालाची उधळण केल्याने रस्त्यावर गुलालाचा थर साचलेला होता.दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

आमदार अनिल पाटील यांना अमळनेरकराणीं दुसऱ्यांदा विजय केल्याने एक नवीन इतिहास घडवण्यास सक्षम ठरला आहे.त्यांची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

आमदार अनिल पाटील यांनी मानले जाहीर आभार….

महायुतीचे उमेदवार अनिल पाटील म्हणाले की, हा विजय हा महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आहे.पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. माझ्या विकास कामावर तालुक्यातील जनतेने विश्वास टाकला.मला एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून दिले. त्यामुळे मी अमळनेर करांच्या ऋणात राहू इच्छितो.सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते,नातेवाईक, मित्रपरिवार यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!