गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मंत्र्यांच्या सोबत असल्याने अमळनेरकरानीं गुंड प्रवृत्तीचे कोण हे ओळखावे….माजी आमदार शिरीष चौधरी

 

अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी काल मंत्री अनिल पाटील यांचे आरोपाचें खंडन पत्रकार परिषद घेऊन केले.

सविस्तर वृत्त असे की,मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षा तर्फे जाहीरनामा प्रसिद्ध निमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीष चौधरी हे गुंडगिरी करीत असल्याचा आरोप केला होता.त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी काल दिनांक ७ नोव्हेंबर रोजी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की,माझ्या वर गुंडगिरीचा आरोप करणे हे मंत्र्यांचे बालिश पणाचे लक्षण आहे.मंत्री लहान मुलां सारखं वागणे बोलणे करतात,त्यांच्या आजूबाजूला महिलाची छेडछाड करणारे गुन्हेगार, खुनाचा आरोप असलेले संशयित आरोपी,३०७ चां गुन्ह्यातील आरोपी,ट्रॅव्हल वाल्या वर हल्ले करणाऱ्यां गराड्यात वावणारे तथा त्यांचे प्रेरणास्थान असलेले कोण आहे हे अमळनेरकराना माहीत आहे.मंत्री हे गुन्हेगारा सोबत फिरत आहे,गाव खेड्यात फिरताना गावकऱ्यांना न चालनारे घेऊन फिरत आहेत त्यामुळे ते मत मागत आहे की दादागिरी करत आहेत, गावकरी त्यांना का नाकारत आहे याचे अवलोकन मंत्र्यांनी करावे,मी कोरोणा काळात मदत केली म्हणून जीवावर आली आहे.खासदार स्मिता वाघ यांना धमकी बाबत स्वतः पोलिस ठाण्यात निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे तसेच राज्याचे गृहमंत्री यांच्या कडे सुध्दा या बाबत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले,मंत्री हे माझ्या वर आरोप करतात की मी तरुणांना दारू पाजतो तर हे साफ खोटे असून मी स्वतः सुपारी सुध्दा खात नाही,मला कोणतेच व्यसन नाही,याउलट मी आमदार असताना गावा गावात तरुणांना व्यायाय शाळा बांधून दिल्या आहेत,मंत्री यांनी नगरपालिका निवडणुकीत बदनामीचे षडयंत्र केले होते मात्र आता त्यांचा हा डाव अमळनेर कर हाणून पडतील,त्यांना जर नंदुरबार बद्दल एव्हढा द्वेष असेल तर ते नंदुरबार चे पालकमंत्री का झाले,तेथील बॅगा घेऊन का येतात,मंत्री यांनी धरणासाठी एक ही रुपया आणला नाही,केंद्रीय जल आयोग परवानगी मीच आणली,पर्यावरण, वन विभाग,भूसंपादन मान्यता आणल्या,सुप्रमा माझ्या सह माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सुध्दा आणल्या आहेत,२० तारखेच्या अल्टिमेट बाबत बोलताना त्यांनी सांगितले की,जो गर्जता है वह बरस्ता नहीं,प्रशासकिय बिल्डिंगची बांधकाम मान्यता माझ्या पत्रावर मंजुर झाली आहे, अमळनेरच्या विकासासाठी येणाऱ्या काळात ज्याची सत्ता तिथे मी सहभाग घेणार असल्याचे ही त्यांनी सांगितले,या मातीत माझा जन्मं झाल्याने चांगले संस्कार झाले त्यांचा जन्म भडगाव मधील आहे,त्यांच्या संस्कारात आपल्या गुरु बाबत अपशब्द बोलणे बसते,हे संस्कार कुठले ? त्यांनी नौटंकी करत माजी आमदार साहेबराव दादांचा राजकीय बळी घेतलां असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला.

याप्रसंगी शिरीष चौधरी यांचे वडील बंधू प्रा डॉ रविंद्र चौधरी,शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे बबलू पाठक, गुलाब पाटील,अबू महाजन,सौ रेखा चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!