अमळनेर दि.२३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथील अंधेरी येथे कॉम्बॅट मार्शल आर्ट्स असोसिएशन द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आली.यात अमळनेरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरातील मुला मुलींनी घवघवीत यश संपादन केले.

