प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये हाजी सलीम शेख फत्तू यांना मतदारांचा वाढता पाठींबा विरोधकांनी घेतला धसका….

अमळनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगू लागली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 13 ब चे अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तू (शेखा मिस्त्री ) यांना सर्व समाजातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असल्याने त्याचा धसका विरोधकांनीं घेतल्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

 शेखा हाजी यांनी प्रभागातील पाण्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छता यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांनी ‘विकास’ हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. शेखा हाजी यांच्या अपक्ष उमेदवारीने येथील राजकीय समीकरणे बदलली असून, सर्वच उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्रभाग 13 ब मध्ये शेखा हाजी यांचे हे शक्तिप्रदर्शन प्रतिस्पर्धी उमेदवारांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!