अमळनेर येथील प्रभाग क्रं १३ मधील इच्छुक उच्च शिक्षित,स्वेच्छा निवृत्त पोलीस उमेदवार सुनील महाजन यांच्या कडे स्थानिक मतदारांचा कल वाढलेला बघायला मिळते.
प्रस्थापित राजकारण्याच्या घराणेशाहीला प्रभागातील सर्वसामान्य गोर गरीब लोक कंटाळाले असून परिवर्तन घडविण्याच्या तयारीत आहे. सध्या घराणेशाही विरोधात सर्वसामान्यांनी चंग बांधला आहे. १५ ते २५ वर्षे निवडणूक लढवून पण प्रभागातील विकासाची माय मेलेलीच असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष नगरसेवक राहून ही यांचे मन भरत नसेल तर हे लोकं फक्त नि फक्त सत्ता चे लालसेपोटी च राजकारणात असल्याची सर्व सामान्य लोकांची भावना झालेली दिसते. तसेच यांना देशहित,समाजहित मान्य नाही की परिसरातील इतर सर्वसामान्य, गरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही देणे घेणे नाही. लोकांचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच वापर करून घ्यायचा. म्हणूनच आता मतदारांनी ठरवलेय की यांची जिरवायची, स्वच्छ, निस्वार्थी, व समाजासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याची धमक असलेल्या तसेच लोकांच्या कल्याणाचा मार्ग , मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी , कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मार्ग काढू शकणार, अश्या सर्व सामान्य, गरीब कुटुंबातील,देशाप्रती,समाजाप्रती उच्च प्रेम असलेल्या सुनील महाजन यां उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याच्या चंग मतदारांनी आपसात बांधल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे.