अठरा पगड जातीच्या समूहा समवेत सुनील महाजनांचा नामांकन अर्ज दाखल….

      अमळनेर येथील न पा निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्यास प्रभाग क्रं १३ ब मधील इच्छुक उमेदवार सुनील महाजन यांच्या समवेत प्रभागातील अठरा पगड जात समूहातील व्यक्ती हजर असल्याने त्यांच्या विजयाची नांदी.

        राज्य निवडणूक आयोगाने रविवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुभा दिल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ढोल ताशाच्या गजरात गर्दी गोळा करून दाखल केले.

        मात्र प्रभाग क्रं १३ ब मध्ये नगरसेवक साठी इच्छुक उच्च शिक्षित असलेले सुनील महाजन यांनी अगदी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवीत आपला नामांकन अर्ज साध्या पद्धतीने भरला. यावेळी त्यांच्या समवेत असंख्य समाज बांधव माळी, भोई, कोळी, तेली, चौधरी, वाणी, धोबी, न्हावी, ब्राह्मण, साळी, मुस्लिम, चांभार, कासार,पाटील, बारी, बडगुजर आदी वार्डातील सर्वच सर्व सामान्य लोकं हजर होते.

    सर्व समाज घटक एकत्रित आणण्याची किमया घडविल्याने यंदा प्रभागाच्या विकासाची धुरा सुनील महाजन यांच्या हाती देण्याचा चंग बांधल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!