पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमळनेर शिवसेनातर्फे मोफत नेत्र तपासनी शिबिराचे आयोजन….

अमळनेर : जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५ रोजी अमळनेर शिवसेना व यशोदा फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिबिराचे ठिकाण :-

     शिवसेना संपर्क कार्यालय, भांडारकर कंपाऊंड (खड्डाजीन) बस स्टँड समोर, भागवत रोड येथे सकाळी ९ वाजेपासून शिबिराचे आयोजन.

शिबिराचे उद्घाटक पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील जिल्हाप्रमुख (महिला) सरिता (माळी) कोल्हे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. डॉ. श्रद्धा मोरे आणि डॉ. प्रशांत मोरे यांच्या मार्फत लाभार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून तालुक्यातील गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील तसेच सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!