अमळनेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या वतीने आयोजित बैठकीत यंदाच्या जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मेजर विनोद बिऱ्हाडे तर सचिवपदी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नियोजन बैठकीत उत्साहाचे वातावरण
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतपेढी येथे ही महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. यावेळी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत केवळ मिरवणूकच नव्हे, तर वैचारिक आणि सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.
नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष: मेजर विनोद बिऱ्हाडे
उपाध्यक्ष: गोपीचंद चव्हाण व प्रमोद बिऱ्हाडे
खजिनदार: सतीश सोनवणे
सचिव (सेक्रेटरी): माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ संदानशिव
समाजहिताचे विविध उपक्रम
यावेळी बोलताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी यंदा मॅरेथॉन, व्याख्यानमाला, रांगोळी, चित्रकला आणि सामान्य ज्ञान स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातून समता आणि शिक्षणाचा संदेश देण्याचा मुख्य उद्देश आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीसाठी प्रा. विजय तूंटे, प्रा. भानुदास गुलाले, प्रा. जितेश संदानशिव, आयु. गौतम मोरे, बापू निकम, अशोक बिऱ्हाडे, चिंधू वानखेडे, प्रा. सुनील वाघमारे, प्रा. कृष्णा संदानशिव, सुरेश वानखेडे, ज्ञानेश्वर संदानशिव, चंद्रकांत संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, राहुल संदानशिव, राजेंद्र संदानशिव, संजय बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, समाधान बिऱ्हाडे, दिनेश संदानशिव आणि भिका संदानशिव यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
नवनियुक्त अध्यक्ष आणि सचिवांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, संपूर्ण अमळनेर शहरात जयंती उत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे.