नाथपंथी समाज उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांचा करण्यात आला सत्कार…..

    अमळनेर : नुकत्याचं झालेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत सलग सहाव्यादा निवडून आल्या बद्दल अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ साहेब यांचा सत्कार उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी यांच्या वतीने CBD बेलापूर मुबई येथे 26 जानेवारी ला सत्कार करण्यात आला व पुढील कार्यकाळा साठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

   याप्रसंगी महाराष्ट्र सचिव योगेश बर्वे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कानडे, नव नाथपंथी समाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रोहित कानडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभा ताई शिंदे,महासंघ जिल्हाध्यक्ष बाळाकृष्ण जाधव,जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष शुभम बुवा, संगमनेर तालुका महिला अध्यक्ष रूपाली आहेरकर आदी उपस्थित होते.कार्यक्रम साठी काशीनाथ वरपे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!