आचार संहिता भारतीय निर्वाचन आयोग द्वारा निवडणुकी पूर्वी लागू केली जाते.निवडणूक प्रक्रिया संपल्यावर संमाप्त केली जाते. निवडणुकी दरम्यान उमेदवार, राजकीय पक्ष यांना नियमांचे पालन करने आवश्यक असते.
आचार संहितेत कोणते कामे होतात किंवा होत नाही…
सर्वसाधारण पाहता शासकीय कार्यायलयात आचार संहितेचा बाऊ करून कामकाज थांबविले जाते.कर्मचारी तथा अधिकारी आचार संहितेचे कारण सांगून कामकाज ठप्प करतात. सर्व साधारण नागरिकांना वेठील धरले जाते
आचार संहितेत खालील कामे केली जाऊ शकतात….
1 वीज अथवा पाणी बाबत ची कामे.
2 रस्त्याची डागडुजी बाबत कामे.
3 जात प्रमाण पत्र बनविणे.
4 पेन्शन बाबतची कामे
5 साफसफाई बाबतची कामे
6 आरोग्य विषयक आर्थिक तरतूद करने बाबतची कामे.
7 आधार कार्ड बनवणे
8 चालू असलेले प्रोजेक्ट सुरूच ठेवणे
9 घर बांधकाम च्या नकाशा मंजुरी बाबत कामे. मात्र नव्याने प्रस्ताव सादर करता येत नाही.
वरील कामाच्या बाबतीत कोणताच अधिकारी कामकाज थांबवू शकत नाही.
आचार संहितेत नहोणारी कामे….
1 नवीन कामाची स्वीकृती,सार्वजनिक शिलान्यास, उदघाट्न.
2 सरकारी वाहनां वरील सायरन बंदी
3 सरकारी लाभाच्या योजनाचे होर्डिंग वर बंदी
4 शासकीय दौरे यावर बंदी
5 सरकारी कार्यालयात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री सह राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास बंदी.
6 शासकीय जाहिराती वर बंदी.
7 मतदातांना आर्थिक प्रलोभन देण्यावर बंदी.
8 सोशियल माध्यमातून कोणाच्या भावना दुखविणाऱ्या पोस्ट वर बंदी.
*आचार संहितेचे नियम*
– निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचार संहिता लागू होते आणि मतमोजणी होईपर्यंत सुरू राहते.
– आचार संहितेचे पालन करणे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी आवश्यक आहे.
*नियमांचे पालन करण्याची आवश्यकता*
– आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून शिक्षा ठोठावण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.
– आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवार किंवा राजकीय पक्षांवर कारवाई केली जाऊ शकते.
*नियम*
– नवीन योजनांची घोषणा करता येत नाही.
– सरकारी वाहने, विमाने आणि सुविधा प्रचारासाठी वापरता येत नाहीत.
– सरकारी पैसा राजकीय पक्ष किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही.
– धार्मिक किंवा जातीय आधारावर मतदान मागणे वर्जित आहे.
– रॅली किंवा सभांसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
*उल्लंघन केल्यास कारवाई*
– आचार संहितेचे उल्लंघन केल्यास उमेदवार किंवा राजकीय पक्षांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
– निवडणूक आयोगाकडे आचार संहितेचे पालन करण्याची जबाबदारी आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्याला कोणीही धार्मिक – जातीय वळण नदेता अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडणे हें प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कृती करने अपेक्षित आहे. शासकीय अधिकारी वर्गाने मनमानी कारभार नकरता विनाकारण नागरिकांना वेठीस धरू नये. आचार संहितेच्या नियमात बसणारी कामाकाज आवश्य करावीत.
नागरिकांना आवाहन….
देशातील सुज्ञ नागरिकांनी आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे.आचार संहितेचे नाव पुढे करून शासकीय कामकाजास नकार देणाऱ्या कर्मचारी अथवा अधिकारी यांची माहीती करडी नजर न्यूज ला कळवावी. आपणाला नक्कीच न्याय मिळवून देण्यास आम्ही सज्ज आहोत. आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. योग्य उमेदवाराची निवड करून आपल्या परिसराचा विकास करून घ्या.
चला तर मग जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात पार पाडूया…
खान्देशातील स्थानिक सत्तेची प्रयोगशाळा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर, नगरपालिका निवडणुका (नगरपरिषदा) आता केवळ स्थानिक विकासाचे माध्यम राहिलेल्या नाहीत; त्या प्रादेशिक…
अमळनेर येथील गांधली पुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आणि गांधलीपुरा पोलिस ठाण्याच्या नजरेच्या टप्प्यावर असलेल्या वेश्याव्यवसाय बंद…