अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावांत महिला शौचालयास गेली असता तेथील एकाने विनयभंग केल्याने त्याच्या वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त की, तालुक्यातील पातोंडा गावातील साडी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेचा दिनांक 03/11/2025 रोजी सायं. 07.30 वाजेचे सुमारास घरून दापोरी रस्त्याकडेस शौच्छास जात असतांना गावातील अरूण संदानशिव नामक व्यक्ती ने अश्लील भावभाव करीत तुझा नवरा तुझे काय करू शकत नाही, तुला काय लागत आहे मी सर्व पुरविणार, तुला साडया पण विकु देणार नाही, असे म्हणुन हात धरून अंगावर ओढुन घेवुन तु माझे सोबत रहा, मी तुला सुखी ठेवेन, असे म्हणत सदर स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत केल्याने तिने आपले पती सह नातेवाकांना सदरची घटना सांगून पोलीस ठाण्यात गुन्हा रजि दाखल करुन सदर ची प्रत अधिकार असणारे मा.मँजि.सो यांना पाठविण्यात आली असुन, दाखल गुन्ह्याची माहिती मा. पोलीस निरीक्षक सो यांना देण्यात आली असुन, दाखल गुन्ह्याची प्रत नियत्रंण कक्ष जळगांव यांना ई.मेल द्वारे पाठविण्यात आली असल्याचे कळतं.
गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ.संदेश पाटील हे करीत आहेत.
जळगाव : जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत पोलिसांनी…
अमळनेर येथील फटाक्यांसारखा आवाज काढणारे कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकां विरुद्ध वाहतृक पोलिस कारवाईचा बड़गा उगारतील का,असा प्रश्न सुज्ञ नागरिक…
अमळनेर : स्टॅम्प पेपर विक्री करताना अधिकच्या पैशांची मागणी केल्यास किंवा भ्रष्ट वर्तनासाठी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते,असा निर्णय…