जळगाव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी समाधान मैराळे तर जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून यदुविर पाटील निवड नुकतीच करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री गोविंद वाकडे ,राज्य संघटक श्री संजय भोकरे , इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे, राज्य सरचिटणीस श्री डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री किशोर रायसाकडा ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री भुवनेश्वर दुसाने यांच्या मान्यतेने सदर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
सदर नियुक्त्यांमुळे नाशिक विभागात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मजबुती करणाला व पत्रकारांच्या समस्या, अडचणी वरिष्ठ स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. तर वरील निवडीबद्दल पत्रकार बांधव तसेच सर्व स्तराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
