अमळनेर बाजार समितीत स्व. अजित पवार यांच्या ‘शेतकरी प्रेरणा स्मारका’चे अनावरण; ‘बळीराजा सेतू केंद्रा’चेही उद्घाटन

अमळनेर: अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शेतकरी रूपातील बैलगाडी हाकणाऱ्या पुतळ्याचे आणि ‘शेतकरी प्रेरणा स्मारका’चे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील हे अशा प्रकारचे पहिलेच स्मारक असून ते शेतकऱ्यांना ऊर्जा, धैर्य आणि वक्तशीरपणा ची प्रेरणा देईल, असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी शेतकऱ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी फक्त शासकीय शुल्कात उपलब्ध असणाऱ्या ‘बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्रा’चेही उद्घाटन करण्यात आले. बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी स्व. अजित पवार यांच्या योगदानाचे स्मरण करत, निर्माणाधीन व्यापारी संकुलालाही त्यांचे नाव देण्याचा मानस बोलून दाखवला.

या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी, संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!