अमळनेर : अमळनेर व पारोळा तालुक्यांत गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून पिके करपू लागली आहेत. त्यामुळे कर्ज काढून शेतीत गुंतवणूक केलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदने सादर केली.
अमळनेर व पारोळा तालुक्यांत तातडीने पिकांचे पंचनामे करून कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करावी, तसेच शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.