अमळनेर : शिवसेना (युवासेना) पक्षाच्या उपशहर संघटकपदी मोहित नितीन पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना संघटित करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्याचा निर्धार नवनियुक्त उपशहर संघटक मोहित पाटील यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना स्मरून पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल आमदार शिरीषदादा चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहुलभाऊ कंजर, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीणभाऊ पाटील तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि मार्गदर्शकांचे मोहित पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
“ही नियुक्ती केवळ सन्मान नसून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याची मोठी संधी आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण सहकाऱ्यांच्या साथीने युवासेनेची ताकद घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहू,” असा विश्वास मोहित पाटील यांनी व्यक्त केला.
