ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात; भूमिपूजनावरून राजकीय वाद

अमळनेर : प्रभाग क्रमांक ८ मध्ये तब्बल एक कोटी रुपये खर्चाच्या ‘तिरुपती बालाजी नमो गार्डन’चे भूमिपूजन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्यानात योगा हॉल, ओपन जिम, मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, पाथवे, स्टेज, सुरक्षारक्षक कक्ष व तिरुपती बालाजीचा पुतळा आदी सुविधा प्रस्तावित आहेत.

यावेळी शिरीष चौधरी यांनी नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. नगराध्यक्ष यांनीही उद्याना मुळे नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, ताडेपुरा परिसरासाठी प्रस्तावित असलेले उद्यान मध्यवर्ती शहरात नेल्याचा आरोप करत पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी व ताडेपुरा परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ताडेपुराचा विकास पळवून नेण्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा नगरसेविका शोभाबाई गढरे व नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे नमो गार्डनच्या भूमिपूजनावरून अमळनेरात राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!