आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाला मिळाले यश… राज्य सरकारच्या अतिवृष्टी आणि पूरबाधित यादीत अमळनेर तालुका 

जळगाव राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित तालुक्यांची यादी शासन निर्णयात प्रसिद्ध केली आहे. यात अमळनेर तालुका समाविष्ट केला आहे.

जळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा समावेश या यादीत करण्यात आला असल्याचे समजते.जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा,धरणगाव, चोपडा, पाचोरा,जामनेर, जळगाव,भडगाव,रावेर,भुसावळ,बोदवड, मुक्ताईनगर व यावल आदी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत.

कापूस, मका, केळी, सोयाबिन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके नेस्तानाबूत झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीने नागरिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसह आ. अनिल पाटील यानी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपूरावा करून अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश केला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!