अमळनेर जि.प. आणि प. स. च्या आरक्षणाची सोडत सोमवारी… अनेकांचे लक्ष लागून

अमळनेर येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट – गणाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी होणार. कोणाची होणार स्वप्नपूर्ती की हिरमोड बघणे ठरणार उत्सुक्तेचे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १५ पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषगाने सोमवार १३ ऑक्टोबर रोजी या सोडत जाहीर करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, २०२५ नुसार ही सोडत घेण्यात येत आहे. या नियमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.

     त्याच अनुषंगाने अमळनेर मध्ये नगरपरिषद सभागृहात सोमवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सोडत होणार असल्याने याकरिता विशेष सभा आयोजित केली आहे.

गट-गण आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष

                   उपस्थितीचे आवाहन
 परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीसाठी १३  रोजी विशेष  सभा आयोजित करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि जनतेने या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!