सात बारा कोरा करा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही – आमदार बच्चू कडू

      अमळनेर येथील सर्व पक्षीय शेतकरी मेळावा आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षते खाली शहरातील इंदिरा भवन येथे नुकताच संपन्न झाला.

    प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हें शेतकऱ्यांच्या समस्या बाबत लोकमानसात जनजागृती करून त्यांना न्याय मिळवून देण्याकामी राज्य भर दौरे करन सभा घेत आहे आहेत. जळगावं जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्व पक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते.याचाच एक भाग म्हणून अमळनेर मध्ये ही सर्व पक्षीय संघटनेच्या माध्यमातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी प्रस्तावना केली तर शेतकरी नेते शिवराम पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

     सभेला संबोधन करतानां आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या कासोद्यात पाणी पंधरा दिवसांनी येते, शेतकरी मेले तरी रस्त्यावर येऊन शहर बंद होत नाही,शेतकऱ्याबद्दल लोकांची आस्था मृत पावली आहे.शेतकऱ्याच्या न्याय हक्का साठी लढता लढता शरद जोशीचे संसार उध्वस्त झाले, पुण्यात पुतळे उदघाटनास अमित शहा आले मात्र शेतकऱ्यांना भेट नाही, सध्याचे सर्व पक्षीय आमदार पक्षाच्या गुलामित असल्याने शेतकरीला वाली राहिला नाही, अकरा हजार कापसाचे हमीभाव मागितला तर राज्याने 8 हजार रुपये जाहीर केले मात्र शेतकऱ्याला त्याला पेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.दुसरी कडे ट्रम्प च्या पुढे मोदी झुकले, बैला पेक्षा निपत्तर शेतकरी झाला, उत्पादन पेक्षा उत्पन्न महत्वाचे आहे असे सांगून सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही, मांजर कुत्र्याला किंमत पण शेतकऱ्यांला नाही, प्रचंड मेहनत करून वाट्याला अपयश,शेतकऱ्यांचे 35हजार माफ करने अपेक्षित, शेतकरी मुलाला शेतीत काम करण्यापेक्षा कंपनीत काम करने परवडते कारण कंपनीत काम केल्याने लग्न होते मात्र शेतात काम केल्याने मुलगी मिळत नाही,शेवटी आपल्या भाषणात सरकारला त्यांनी प्रश्न विचारला की शेतकरी हिंदू नाही का? त्यांच्या साठी सरकार ने त्वरित निर्णय घेणे अपेक्षीत आहे केंद्रात व राज्यात सत्ता एकाच पक्षाची आहे.

याप्रसंगी मंचावर काँग्रेस सह शिवसेना उबाठा चे तालुका नेते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ बी एस पाटील, बी के सूर्यवंशी, सुरेश पाटील, संदीप घोरपडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाल खेड्यापाडातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!