सरन्यायधीक्ष गवई यांच्या वरील हल्याच्या निषेधार्थ वकील संघांचे एक दिवसीय कामकाज बंद
अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील अमळनेर वकील संघाने मा. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश मा. बी. आर.गवई यांच्यावर झालेल्या हल्लाच्या निषेध म्हणुन दिनांक ०८ / १० / २०२५ रोजी अमळनेर न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याबाबत घेतला निर्णय.
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई हे न्यायदानाचे पवित्र कार्य करीत असतांना त्यांच्यावर अॅड. पांडे राकेश किशोर यांनी हल्ला करण्याच्या प्रयत्न केला त्या घटनेच्या तीव्र निषेध म्हणुन अमळनेर वकील संघांने दि. ०७/१०/२०२५ रोजी ताडतीची बैठक घेऊन सर्वानुमते घटनेच्या तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
सदरचा हल्लाचा प्रयत्न हा केवळ सरन्यायाधिश गवई साहेब यांच्यावरील नसुन तो न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मुल्यावर झालेला आहे.या कारणास्ताव अमळनेर वकील संघांने दि. ०८/१०/२०२५ रोजी कामकाजात सहभाग घेणार नसल्याचे सर्वानुमते ठरवून अमळनेर प्रांतधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा व सत्र न्यायाधिश,जिल्हा न्यायालय अमळनेर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
या प्रसंगी वकील संघांचे अध्यक्ष एड किरण पाटील, सुशील जैन,जी वाय विंचुरकर, केशव कुलकर्णी, राजेंद्र निकम, एड प्रशांत संदानशीव,एस.एस ब्रह्मे,शकील काजी,राजेंद्र भदाणे, दिनेश पाटील,दीपक परमार, सुरेश सोनवणे, कुंदन साळुंखे,प्रदीप भट, किशोर पाटील,प्रशांत बडगुजर, जगदीश बडगुजर,दिनेश महाजन, राजेंद्र कछवा,उमाकांत पाटील, परेश विसपुते, विजय संदानशीव,शैलेश ब्रम्हे,अनिकेत बिऱ्हाडे, सतीश सैंदाणे,अमोल बिऱ्हाडे, यज्ञेश पाटील,राकेश पाटील,सागर ढिवरे,राकेश बिऱ्हाडे , तिलोत्तमा पाटील, अनामिका महाजन, माधुरी ढिवरे,ज्योती बिऱ्हाडे , अविनाश खैरनार,रोहित ढिवरे, ,अमजद खान पठाण, अशपाक अली सय्यद, विवेक चौधरी,महेंद्र भंडारी,रमेश देशपांडे, शुभम ठाकूर आदी उपस्थित होते.
