अमळनेर येथे रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरीच्या विविध मागणी सह कर्जमाफी करिता अमळनेर तहसीलदार कार्यालया समोर सातबारा जाळून केला शासनाचा निषेध.

सदर प्रकरणी अमळनेर तहसीलदार सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील आशयाचा उल्लेख करण्यात आला.त्यात म्हटले आहे की कर्ज माफीचा मुद्दा गाव किंवा तालुक्या पुरता मर्यादीत नाही. जिल्हयातील संपूर्ण शेतक-यांची पिक कर्ज व सातबारा कोरा करुन कर्ज माफी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारच्या वतीने आमचे जर सरकार आले तर आम्ही शेतक-यांना संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करु असे जाहीर नाम्यात आश्वासन दिले होते.सत्ता स्थापने नंतर आता शेतकरी त्या आश्वासनाची आतुरतेने वाट बघत आहेत. शेत मालाच्या बाजार भावात झालेली घसरण, उत्पादनात मोठया प्रमाणात झालेली घट, सतत येत असलेले अस्मानी संकट, विविध आर्थिक अडचणीना करावा लागत असलेला सामना ,यामुळे हजारो शेतक-यांचे कर्ज थकले असल्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाल्याने बँका शेतक-यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतक-यांचे एक प्रकारे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. शासनाचे खोटे आश्वासन एक प्रकारे आत्महत्या करण्यास प्रोत्साहीत करीत आहेत. जळगाव जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा मिळण्यासाठी शासन स्तरावर उपाय योजना करावी व जिल्हयातील शेतक-यांना नैसर्गीक आपत्तीचे अनुदानात वगळण्यात आलेले गावे पुन्हा समाविष्ट करावे या विविध मागण्यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना तर्फे अमळनेर तहसीलदार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नामदेव पाटील, दिलीप पाटील, दिलीप रतन पाटील, अकबर खाटीक,संजय सूर्यवंशी, शिवाजी पाटील, विश्वास पाटील, कॉ.लक्ष्मणराव शिंदे,विजय पाटील आदी शेतकरी कार्यकर्त उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या :–
१) महाराष्ट्रातील शेतक-यांना कर्ज माफीचे दिलेले आश्वासन पुर्ण करावे.
२) जळगाव जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा मिळालाच पाहीजे.
३)जिल्हयातील शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदानात वगळण्यात आलेले नावे पुन्हा समाविष्ट करावे.
४) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेतक-यांनी गोठा शेड, सिंचन विहिर इतर यांचे कुशल अनुदान मिळावे.
