सफाई कामगारांची हजेरी मोबाईल ॲपवरुन घेणे थांबवा.. नपा कामगार संघटना आक्रमक

अमळनेर येथील नगरपालिका सफाई कामगारांना कर्तव्यावर असल्याबाबत मोबाईल ऍप द्वारे हजेरी देणे बंद करावे म्हणून कामगार संघटना आक्रमक.

सफाई कामगारांची मोबाईल द्वारे हज़ेरी घेण्याबाबत शासनाचे कुठलेच कड़क सक्तीचे आदेश नाहीत. तरी देखील नपा प्रशासनाने सफाई कर्मचारी यांची मोबाईल द्वारे हजेरी घेणे सुरुवात केलेली आहे. वास्तविक बहुतांश सफाई कर्मचारी यांच्याकडे मोबाईल नाही. काहींकडे मोबाईल असतो पण त्यांच्याकडे रिचार्ज बॅलन्स नसतो बहुतांश सफाई कर्मचारी मुख्यतः महिला सफाई कर्मचारी असून अशिक्षित आहेत.त्यांना मोबाईल चालवता देखील येत नाही. कधी कधी इंटर नेटची देखील अडचण येत असते. सफाई कर्मचारी यांचा पगार दैनंदिन घर खर्चासाठी अपूर्ण पडतो तर तो मोबाईलला रिचार्ज बैलन्स कसा टाकेल, तसेच मोबाईलला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे देखील सर्व सफाई कर्मचार्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच नपा प्रशासनाने किंवा खाते प्रमुख यांनी सफाई कर्मचारी यांना किंवा सफाई कर्मचारी संघटनाच्या पदाधिकारी यांना पूर्व सूचना देऊन सदर विषय समजून सांगण्यात आलेला नाही तरी म्हणून सदर मोबाईल द्वारे घेतली जाणारी हजेरी अपेवरुन हजेरी घेणेबाबत शासनाचे सक्तीचे आदेश नाहीत. तरी आपण सदर हजेरी घेण्याबाबत सफाई कर्मचारी यांना सक्ती करू नये म्हणुन सर्व कामगार संघटने तर्फे उप मुख्याधिकारी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी किशोर सगेंले,रमेश कलोसे, अनिल बेंडवाल,सोमचंद संदानशिव, अविनाश संदानशिव, रघुनाथ मोरे,रुपचंद पारे , विनोद जाधव यासह अनेक सफाई कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!