अमळनेर: तालुक्यात सध्या उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून, या उष्णतेच्या कहरामुळे आज एकाच दिवशी वेगवेगळ्या चार ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. मात्र, नगरसेवक आणि जागरूक नागरिकांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाची तत्परता यामुळे या आगींवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.

आज दिवसभरात लागलेल्या आगींचा घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
पहिली घटना (दुपारी १२:४५ वा.): मंगरूळ येथे गावालगत असलेल्या खळवाडीला अचानक आग लागली.
दुसरी घटना (दुपारी १:५५ वा.): मारवड रोड परिसरातील एका शेतात आग भडकली.
तिसरी घटना (दुपारी २:०५ वा.): गलवाडे रोडवरील ‘गंगा एक्वा’ कंपनीजवळ असलेल्या झाडांनी पेट घेतला.
चौथी घटना (दुपारी २:१५ वा.): तांबेपुरा परिसर आणि नांदगाव रोड येथील शेतांना आग लागली.

