मुंबई: शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत, अशी सूचना परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जुन पासून सृुरू होत आहेत.घरापासून शाळेपर्यत जाण्यासाठी शासनाने विद्यार्योंना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांनां मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहित्याबाई होळकर योजने अंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घोणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसट़ी पासचे वितरण के्ले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन
रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गठागठाने आगारात जाऊन आगार व्यনस्थापन कडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.
या संदर्भात १६ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यां ची यादी तयार ठेवण्यास सांगितलेआहे.
या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थीं- विद्यार्थिनींना होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
