पारधी समाजातील मुला – मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण…

यावल : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यक्षेत्रातील पारधी समाजाच्या शारीरिक व शैक्षणिक दृष्ट्या पात्र असलेल्या युवक व युवतीसाठी “आदिवासी उपयोजना क्षेत्र” अतर्गत मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये धावणे, लांबउडी, शारीरिक क्षमता वाढविणे तसेच लेखी परीक्षेची तयारी यांचा समावेश असणार आहे. शारीरिक व शैक्षणिक दृष्ट्या पात्र ५০ प्रशिक्षणार्थींना निवडून १ महिन्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता पुढील प्रमाणे :-

1)अर्जदार पारथी समाजातील असावा. 

2) किमान १२वी उत्तीर्ण, 

3) पोलीस भरतीप्रमाणे शारीरिक निकष

4) यासाठी जातीचे प्रमाणपत्र (पारथी समाज), जन्म दाखला, शैंक्षणिक प्रमाणपत्रे,रहिवासी दाखला, ओळखपत्र,आधार कार्ड,मतदार ओळखपत्र, दोनपासपोर्ट साईझ फोटो, 

अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ते ३० जून अशी आहे.

 प्रकत्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल ,चोपड़ा रोड तसेच आदिवासी मुलाचे शासकीय वसतीगृह, जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा,एरंडोल ठिकाणी अर्ज मिळतील.

पारथी समाजातील युवक व युवतीनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प, यावल यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!