निसर्ग ग्रुप तर्फे आंबिवली येथे तब्बल 51 वृक्षाचे लागवड….वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश 

कल्याण प्रतिनिधी,येथील निसर्ग मैत्री ग्रुप कल्याण यांच्यातर्फे (५१)झाडांचे आंबिवली जैव विविधता उद्यान, आंबिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

निसर्ग मैत्री ग्रुप कल्याण यांचे वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आंबिवली जैव विविधता उद्यान, आंबिवली पूर्व येथे (५१)झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.निसर्ग मैत्री ग्रुप परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असते. या वृक्ष लागवडीतून पर्यावरण संतुलन राखण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. वर्षभर ठीक ठिकाणी हजारो च्या संख्येने वृक्ष लागवड वन विभागच्या सहकार्याने करणार असल्याचा निर्धार ग्रुपच्या एड शैलाका शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.

सदर वुक्षरोपन कार्यक्रमात मा.कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय, कल्याण पश्चिम येथील ऍड.शलाका अहिरे,ऍड मीनल इनामदार, ऍड.प्रकाश रासकर, ऍड सुनीता देवरे,ऍड. रंजना म्हात्रे,ऍड. दीपश्री वंटमोरे,ऍड. अनिकेत गुंजाळ,ऍड. निलावती होलमुखे, ऍड.संगीता गोडसे, ऍड.माधुरी जोशी,एड.तबस्सुम बैरागदार तसेच इतर मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!