जळगांव प्रतिनिधी,महाराष्ट्र राज्य महिला आयोग जन सुनावनी “कार्यश्री महिला आयोग आपल्या दारी” कार्यक्रम महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या अध्यक्षते खालील पार पडली .

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंकित कुमार,जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जि.म.बा.अधिकारी जळगाव येथील डॉ .विनिता सोनगत हे उपस्थित होते.
महिला आयोग कडे आलेल्या पिडीत महिलासाठी जनसुनावनीच्या उत्कृष्ट समुपदेशक कौन्सेलर म्हणून कार्य करणेसाठी माननिय रूपालीताई चाकणकर मॅडम यांनी तीन पॅनल तयार करून त्यातील एका पॅनल मध्ये स्वतः सहभाग घेतला.
याप्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलले की,एका महिलेने केलेला अर्ज हा अर्ज नसून एका स्त्रीचे आयुष्य आहे.सदर आयोग हा पॅनल प्रतिनिधीनीच्या माध्यमातून पीडित महिलेची समस्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे रूपाली चाकणकर ताई यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक महिला समुपदेशन केंद्रचे समुपदेशक रेणू प्रसाद,आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, समुपदेशक WCC जळगाव विद्या सोनार,अमळनेर WCC समुपदेशक ज्ञानेश्वरी पाटील, FCC समुपदेशक सुषमा विसपुते, समुपदेशक भाग्यश्री सोनवणे आदी उपस्थित होते.
