अमळनेर, महाराष्ट्र नेहमी दुष्काळमुक्त राहावा, यासाठी पानी फाऊंडेशन निरंतर प्रयत्नशील आहे. पानी फाऊंडेशन महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये जलसंरक्षणासह वॉटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते. या उद्देशाला अनुसरून कार्य करणाऱ्या तालुक्यातील निवडक शेतकरी गटांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मंगळग्रह सेवा संस्था या प्रशिक्षण वर्गाचे प्रायोजक आहे. सदर प्रशिक्षण मंगळग्रह मंदिराच्या सभागृहात दिले जाणार आहे.
पानी फऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक शेतकरी गट कार्यरत आहेत. पैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक २० ते २५ गावांतील शेतकरी गटांना २४ व २५ एप्रिल रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात पहिल्या दिवशी ६० आणि दुसऱ्या दिवशी ६० असे एकूण १२० शेतकरी सहभागी होतील.
पानी फाऊंडेशनतर्फे निवड झालेल्या शेतकऱ्यांनीच या प्रशिक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
