अमळनेर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि विक्रमी प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून धावपटूंनी सामाजिक ऐक्य, समता आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला.

