अमळनेर : शहरातील स्टेट बँकेसमोरून मोटारसायकल चोरून नेणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ज्यूस पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने संधी साधून दुचाकी लंपास केली होती, मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला मुसक्या आवळल्या आहेत.

सविस्तर वृत्त की,दिनांक ५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास निलेश हिम्मत संदानशीव यांनी त्यांची मोटारसायकल (क्रमांक: एमएच १९ बी एल ६८७५) स्टेट बँकेसमोरील एका ज्यूसच्या दुकानाजवळ लावली होती. ज्यूस दुकानदाराने ‘घरून चार्जिंग लाईट घेऊन येतो’ असे सांगून निलेश यांची दुचाकी मागितली होती. दुकानदार दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि तिने ज्यूसची मागणी केली. ज्यूसवाला ग्राहकाला ज्यूस बनवून देण्यात गुंतलेला असताना आणि दुचाकीला चावी लागलेली असताना, संधी साधून त्या अज्ञात इसमाने मोटारसायकल चोरून नेली. थोड्या वेळाने निलेश संदानशीव आपली गाडी नेण्यासाठी आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ पथकाला सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबी तपासण्याचे आदेश दिले.
हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, सूर्यकांत साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, अमोल कर्डीकर, राजेंद्र देशमाने आणि मयूर पाटील यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला.
