अमळनेर येथील श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी

     अमळनेर :खांदेश शिक्षण मंडळ (खा.शि.मं.) संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळा, अमळनेर येथे ‘क्रांतिसूर्य’ महात्मा जोतीराव फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन

​     या मंगल प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, श्री. एस. एस. वाघ, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. आर. सोनवणे, कार्यालयाचे रजिस्टर श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी मनुभाऊ दीक्षित आणि सौ. पी. पी. जोशी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी प्रतिमेला अभिवादन करून महात्मा फुले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थिनींनी घेतला सामाजिक कार्याचा वसा

​       कार्यक्रमादरम्यान महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थिनींनी त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संकल्प केला. देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक कार्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा निश्चय यावेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केला.

​    हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजनामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!