अमळनेर : पवनपुत्र गणेश उत्सव मित्र मंडळ, भोईवाडा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

यावेळी डी.वाय.एस.पी. विनायक कोते यांनी रक्तदात्या युवकांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच युवकांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे अभिनंदन केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाबाबतचे गैरसमज आणि नियमित रक्तदानाची गरज याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोई आणि स्वप्नील शिंगाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी, “यापुढेही आपल्या परिसरात सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवणार असून, समाजहितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास अर्बन बँकेचे रणजित शिंदे, अमेय मुंदडा आणि डॉ. पंकज महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली.
या शिबिरात योगेश भोई, सचिन बारी, यश चौधरी, स्वप्नील शिंगाणे, गणेश शिंगाणे, पंकज बाविस्कर, भूषण भोई, प्रवीण शिंगाणे, योगेश राजपूत, अजय शिंगाणे, चेतन कोळी, गुरुदास कोळी, कृष्णा चौधरी, सुनील कोळी, दीपक ढोले, पंकज ढोले, सागर भोई, सागर शिंगाणे, सुकदेव चौधरी, रोहन वडिले, गणेश भोई, राजेंद्र भोई, गंगाराम भोई, जयेश भोई, राकेश शिवदे, देविदास साटोटे, योगेश भोई, गणेश कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संदीप भोई, किशोर शिंगाणे यांच्यासह युवकांनी रक्तदान केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जितू कोळी, दिनेश भोई, स्वप्नील कोळी, राजमल शिंगाणे, परशुराम कोळी, उमेश महाजन, राहुल भोई, शशिकांत कोळी, विक्की भोई, भीका कोळी, साई भोई आणि किरण चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“रक्तदान करा—जीवनदान द्या!” या संदेशातून जनजागृती करत मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड दिली. सेवाभावी उपक्रमातून समाजहिताची भावना अधिक बळकट करण्याचा संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला.
