अमळनेर: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने अमळनेर शहरात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख कामगिरी बजावली. या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.

