ढोल-ताशांचा गजर, बैलगाडीवरून मिरवणूक अन् पोलिस दादांचा जल्लोष!

अमळनेर  : अमळनेर पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, बैलगाडीवर सजविलेला गणराय आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त जल्लोष अशा उत्साही वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

अमळनेर पोलिस ठाण्यातून गणरायाची मिरवणूक बैलगाडीवरून काढण्यात आली. ढोल-ताशांच्या तालावर पोलिस दादांनी मनसोक्त नृत्य करत गणेशोत्सवाचा आनंद लुटला. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. पोलिस ठाण्यापासून निघालेली ही मिरवणूक पोलिस कॉलनीत पोहोचली. तेथे धार्मिक आणि पारंपरिक वातावरणात विसर्जनाचे विधी पार पडले.

त्यानंतर गणरायाला तापी नदीत विसर्जित करताना उपस्थित पोलिस अधिकारी दत्तात्रय निकम व कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला. उत्सवातील आनंद, जल्लोष आणि भक्तिभावा नंतर विसर्जनाच्या क्षणी अनेकांचे मन गहिवरून आले. यावेळी बहुतांश पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गणरायाच्या निरोपाने पोलिस बांधवांच्या मनात पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनाची आतुरता निर्माण झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!