अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या मालमत्ता कर आकारणी, भाडेवसुली आणि व्यापारी गाळेधारकांना दिलेल्या नोटिसांच्या निषेधार्थ अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी नगरपरिषद व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ही वसुली पद्धत थांबवून नागरिकांना दिलासा न दिल्यास विविध सामाजिक संघटनांसह आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

