ब्रेकिंग न्यूज: अमळनेरात ‘श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी’ परिसरात तब्बल ९०० किलो क्लोरीन वायूची गळती; नागरिकांना ४८ तास न जाण्याचे आवाहन!….. ​गळतीमुळे श्वास घेण्यास त्रास व डोळ्यांची जळजळ होण्याचा धोका; टेकडीचा १ किमी परिसर हायअलर्टवर

अमळनेर : येथील प्रसिद्ध श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. टेकडी परिसरात क्लोरीन वायूचा वापर केला जात असताना झालेल्या अचानक तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे ९०० किलो क्लोरीन वायूची गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.

​पुढील ४८ तास ‘या’ परिसरात जाण्यास सक्त मनाई!

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, सर्व पर्यावरणप्रेमी, भाविक भक्त आणि परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून नम्र आवाहन करण्यात आले आहे की, पुढील ४८ तास श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीच्या १ किलोमीटर परिसरात कोणीही जाऊ नये. हा संपूर्ण परिसर सध्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आला आहे.

​क्लोरीन वायूचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम:

​हा वायू अत्यंत तीव्र आणि घातक असल्याने त्याच्या संपर्कात आल्यास खालील आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात:

​🔺 श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे.

​🔺 डोळ्यांची तीव्र जळजळ होणे.

​🔺 चक्कर येणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे.

​🔺 इतर श्वसनविकार आणि आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होणे.

​विशेष आवाहन: माहिती पुढे शेअर करा!

​”सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांचे सहकार्य आणि सतर्कताच त्यांची सुरक्षितता ठरणार आहे. नागरिकांनी स्वतः सुरक्षित राहावे आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचवून सहकार्य करावे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना टळू शकेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!