11 वर्षांच्या गुरुहर्ष विद्यार्थ्यांने बसमध्ये सापडलेले पैसे केले पोलिसांना सुपूर्द 

अमळनेर प्रतिनिधी, अमळगांव येथील 11 वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपला प्रामाणिकपणा दाखवत बसमध्ये सापडले पैसे व बँकेचे पासबुक पोलिसांसमक्ष संबंधित मालकास परत केल्याने या विद्यार्थांचे कौतुक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, अमळगाव येथील गुरुहर्ष चौधरी वय 11 वर्षे हा शहरातील साने गुरुजी विद्यालयात इ. 5 वी शिक्षण घेत आहे. तो अमळगांव येथील गोटू चौधरी यांचा नातू असून दररोज अमळनेर ते अमळगाव ये-जा करतो दि. 29 ऑगस्ट रोजी त्याला अमळनेर खवशी बसमध्ये खाली पडलेली प्लस्टिक पिशवी दिसली त्यात बँक ऑफ बरोडा अमळनेरचे पास बुक व रोख रक्कम आढळली. त्याने ते पासबुक. खोकरपाट येथील रहिवासी लालसिंग हिलाल पाटील यांचे असल्याचे समजल्यावर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक विकास देवरे व ठाणे अंमलदार मिलिंद बोरसे यांचे समक्ष देण्यात आले. पैसे मिळाल्याबद्दल लालसिंग पाटील यांनी गुरुहर्षचे कौतुक करत बक्षीसही दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!