अमळनेर येथील जिल्हा न्यायालय क्रमांक दोनमध्ये एका कौटुंबिक खटल्याची सुनावणी सुरू असताना एक धक्कादायक प्रसंग घडला. पुणे येथील रहिवाशी आणि मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश केरनाथ कांबळे यांना अचानक गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका (सिव्हिअर अटॅक) आला. झटक्यामुळे ते कोर्टातच कोसळले आणि काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला.
या प्रसंगाची गंभीरता ओळखून ॲड. प्रशांत संदानशिव यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रकाश कांबळे यांना “सीपीआर” दिला त्यामुळे ते पुन्हा शुद्धी वर आले. ऍड प्रशांत संदानशिव यांच्या सोबतिला ॲड. जगदीश बडगुजर, ॲड. राकेश पाटील, ऍड शरद ब्रम्हे तसेच न्यायालयाचे अधीक्षक आणि कर्मचारी धावून आले. ॲड. संदानशिव यांनी स्वतःच्या वाहनाने त्यांना डॉ. बहुगुणे यांच्या दवाखान्यात दाखल केले.
डॉ. बहुगुणे यांनी तपासणी करून सध्या कांबळे यांची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याची माहिती दिली.
वकिलांच्या चातुर्याने आणि मानवी संवेदनशीलतेने एका अधिकाऱ्याचा जीव वाचल्याने न्यायालय परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.
अमळनेर प्रतिनिधी,येथील व्यवसायाने शिक्षक असलेले समुपदेशक कलाकार तथा प्रबोधनकार श्री आर बी पाटील तथा कोकोकोला सरांच्या “सूलटी फिटिंग”कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र…