तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अमळनेर पोलीसांच्या हाती मोटार सायकल चोर….

अमळनेर येथील शहरात काही ठिकाणा वरून मोटरसायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन अमळनेर गुन्हे शोध पथकाने स्वीकारून तंत्रज्ञानच्या सहाय्य घेऊन धुळे येथील एकास पकडण्यात यश मिळविले आहे.

  पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद काकळीज, पोहेकॉ मिलींद सोनार, पोकॉ विनोद संदानशिव, पोकॉ निलेश मोरे, तसेच पोहेकॉ चंद्रकांत पाटील, पोहेकॉ विनोद सोनवणे,पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलींद जाधव असे अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुरंनं 503/2025, गुरंनं 13/2026, भारतीय न्याय संहीता कलम 303 ( 2 ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलींचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना अमळनेर परीसरात चोरी होणारे मोटार सायकल बाबत सीसीटीव्ही कॅमेरा तसेच तात्रींक विश्लेषण तसेच ठिकठिकाणाचा डम डाटा काढुन सदर चोरी करणारा अरबाज शेख साजीद मनियार, वय- 28 राहणार-धुळे यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एक विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केल्याने अरबाज शेख साजीद मनियार या आरोपीतास गुन्ह्यात अटक करुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चोरलेल्या मोटार सायकली या धुळे शहरात लपविल्याचे सांगितल्याने. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगांव परीमंडळ यांची परवानगी घेवुन तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे धुळे शहरात जावुन आरोपीतांकडुन खालील नमुद मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.

 जप्त वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे-

1) 30000/- रुपये कि.ची एक हिरो कंपनीची स्पेंडर प्लस डीआरएस काळया व ग्रे रंगाची मोटर सायकल क्र MH19-EJ5439 चेसीस नंबर MBLHAW238P5J14688 इजिन नंबर HA11E8P5J64565 जु.वा.कि.अं

2) 50000/- रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 काळया रंगाची स्कुटी क्र. MH18BY6692 चेसीस नंबर MB8DP12DJN8D28647 इजिंन नंबर AF212956515 जु.वा.कि.अं

3) 50000/- रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 निळया रंगाची स्कुटी क्र. MH39AN8269 चेसीस नंबर MB8DP12PGR8A15158 इजिन नंबर AF21536307 जु.वा. कि. अं 130,000/- असे एकुण रुपये किं. चे मुद्देमाल जप्त केले आहे.

तरी वर नमुद आरोपी व विधी संघर्ष ग्रस्त बालकाकडुन एकुण वर नमुद किमंतीच्या मोटार सायकली मिळुन आल्याने वर नमुद मोटार सायकली जप्त करुन तसा सविस्तर पंचनामा करुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले असुन सदर आरोपीतांना अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुरंनं 308/2025 भारतीय न्याय संहीता कलम 303 ( 2 ) प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले असुन सदर

गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील व गुरंनं 13/2026 भारतीय न्याय संहीता कलम 303 ( 2 ) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकॉ मिलींद सोनार हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!