अमळनेर (प्रतिनिधी) : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये लाचखोरीविरोधी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्यामार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील विविध शासकीय आस्थापनांच्या परिसरात जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले.

