अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरात कचरा संकलनातील कथित अनियमितता, वेळेवर कचरा न उचलणे आणि काही ठिकाणी कचरा जाळण्याच्या प्रकारांवरून नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून कचरा व्यवस्थापन थेट नगर परिषदेने हाताळावे, अशी मागणी अमळनेर शहर स्वच्छता व नागरी हक्क मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे.

