अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपालिकेने शहर स्वच्छतेचा संकल्प केला असला, तरी शहरातील कचरा संकलनासाठी दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्यामुळे या संकल्पाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून नाशिक येथील एस.आर. ग्रीन एम्पायर, नाशिक नामक संस्थेमार्फत शहरातील कचरा संकलनाचे काम केले जात आहे. मात्र, या कामात अनेक अनियमितता असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याने संबंधित एस.आर. ग्रीन एम्पायर, नाशिक च्या ठेकेदाराला पुन्हा ठेका देण्याची भूमिका नगरपालिकेकडून का घेतली जात आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

