अमळनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अशोक पाटील, तर सरचिटणीसपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड!

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव गट) अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जयवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पार पडली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजू देवचंद पाटील, ‘ग. स.’ सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर, जिल्हा संघाचे नेते व उपाध्यक्ष वाल्मिक मराठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विलास नेरकर यांनी या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

 * अध्यक्ष : अशोक रघुनाथ पाटील

 * सरचिटणीस : विजय आनंदा पाटील

 * कार्याध्यक्ष : राहुल भगवान सोनवणे

 * कोषाध्यक्ष : समाधान खैरनार

 * उपाध्यक्ष : योगेश्वर भाऊराव पाटील, दत्तात्रय बारकू सोनवणे, हिंमत चौधरी, ज्ञानेश्वर कुवर

 * सहसचिव : हिरालाल धर्मा सैंदाणे, योगेश भदाणे, प्रीतम रत्नपारखी

 * ज्येष्ठ मार्गदर्शक : जगदीश भटू पाटील, किशोर देसले, रियाज शेख, रवींद्र प्रभाकर पाटील

 * तंत्रस्नेही मार्गदर्शक : सुधाकर पाटील, शंकर बोरसे, नामदेव अहिरे, संदीप सूर्यवंशी, भरत जाधव, निलेश मोतीलाल पाटील

 * संघटक : विजय बिर्हाडे, सुनील देवरे, जिजाबराव पाटील, हेमंत शिंदे, विलास मोरे, प्रशांत पाटील, कमलेश मोरे, कुणाल पोतदार, सुधीर पाटील, संदीप गुलाबराव पाटील, राजेंद्र संभाजीराव पाटील, अरुण पवार

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीचा निर्धार

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षक संघ कायम आग्रही राहील, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांना सोबत घेऊन समन्वयाने व एकजुटीने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या निवडीनंतर अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास माजी सरचिटणीस मोहन ताडे, भटू आप्पा शिरसाठ, तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव गट) अध्यक्ष संदीप वाघ, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, ज्येष्ठ केंद्रप्रमुख किरण शिसोदे, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, वाल्मिक भदाणे, महेश पाटील, सचिन पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!