अंमळनेरात उमेदवारी भरण्यासाठी उसळली तोबा गर्दी….

     अमळनेर : राज्य निवडणूक आयोगाने रविवारी अर्ज स्वीकारण्यास मुभा दिल्याने अमळनेर न पा निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली.

   नगर परिषद, नगरपंचायती मध्ये येत्या २ डिसेंबर रोजी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारासह नामांकन अर्जावरील सूचक अनुमोदक आणि समर्थक ढोल ताशा सह गाजत वाजत नामांकन अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली.

   रविवारी तब्ब्ल सदस्य पदासाठी 110 तर नगराध्यक्ष पदासाठी 03 अर्ज दाखल करण्यात आले.

     याप्रसंगी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व मुख्याधिकारी शिंदे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करीत अर्ज दाखल करून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!