अमळनेर (प्रतिनिधी) : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व १८ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील मुख्य रस्ते, दुभाजक, अंतर्गत रस्ते, नाले, गटारी, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे.

